बालदिन : ओस पडलेले मैदान पुन्हा एकदा मुलांनी बहरू लागले

हडपसर : भोसले गार्डन येथील लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वाढलेले मोठे गवत काढल्याने ओस पडलेले मैदान पून्हा एकदा मुलांनी बहरू लागले आहे. 
हडपसर : भोसले गार्डन येथील लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वाढलेले मोठे गवत काढल्याने ओस पडलेले मैदान पून्हा एकदा मुलांनी बहरू लागले आहे. 

हडपसर : भोसले गार्डन येथील मैदानवरील ओपन जिम व लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वाढलेले मोठे गवत काढण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. मैदानाची दुरवस्था याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द झाल्याने महापालिकेने मैदान स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. तसेच मैदानातील बंद असलेले विदयुत दिवे देखील दुरूस्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मैदानावरील वॅाकिंग ट्रॅकमधील गवतदेखील काढण्यात आले आहे. जागोजागी साठलेला कचरा उचलण्यात आला आहे. विदयुत दिवे चालू झाल्याने पहाटे व सायंकाळी मैदानावर आलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे फिरता येवू लागले आहे. यापूर्वी मैदानातील खेळण्यामध्ये, ओपन जीम आणि जॅागिंग ट्रॅकमध्ये गुढगाभर गवत साठले होते. त्यामुळे लहान मुलांना खेळता येत नव्हते. नागरिकांनी जीमचा फायदा होत नव्हता. मात्र महापालिकेने वृत्ताची दखल घेऊन मैदानाची स्वच्छता व अन्य कामे सुरू केल्याने ओपन जीम, लहान मुलांची खेळणी आणि जॅागिंग ट्रॅकवर नागरिक व मुलांची गर्दी वाढली आहे. 

विरोधी पक्ष नेते चेतन तुपे याबाबत म्हणाले, या मैदानावर पूर्वी शाळेचे आरक्षण होते. ते बदलून हे मैदान क्रीडांगणासाठी राखीव झाले आहे. नागरिक व मुले-मुली आणि तरूणांसाठी अधिकाधिक सुविधा येथे करण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिने येथे सुरक्षारक्षक देखील ठेवण्यात येईल. येथील स्वच्छतागृहात पाणी उपल्बध करून देणे तसेच नागरिकांच्या सुचना लक्षात घेऊन हे मैदान विकसित केले जाईल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com