पुणेः कचरा गाडया आडवून पाठविल्या परत...

हडपसरः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकीया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. तसेच रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
हडपसरः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकीया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. तसेच रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.

हडपसर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकिया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. जनतेचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले तर रोकेम प्रकल्प बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला. हे आंदोलन विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (मंगळवार) अकरा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथे झाले.

हे आंदोलन पूर्व नियोजीत नव्हते. अचानक गाडया आडविल्या गेल्याने रामटेकडी ते औदयोगीक वसाहत या दरम्यानच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. घटना समाजताच वानवडी पोलिस तत्काळ पोहचले. परवानगी शिवाय आंदोलन करू नका, अशी समज पोलिसांनी आंदोलकांनी दिली. त्यानंतर पोलिस निघून गेले. त्यानंतरही पून्हा काही कार्यकर्त्यांनी कचरा गाडया आडवून परत पाठविल्या.

याप्रसंगी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक अशोक कांबळे, उत्तम अल्हाट, मामा अल्हाट, हेमंत ढमढेरे, जॅकी कल्याणी, नागेश काळुंखे, आप्पा गरड, आप्पा शिंदे, तुषार जाधव, युसुफ पठाण, इरफान तांबोळी, तोफिक सैय्यद, चिंतामन लाकडे, नदीम पटेल शरीफ पठाण, मुस्ताक शेख यांसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  

रामटेकडी येथील रोकेम प्रकल्पात सध्या ३०० टन प्रतिदिन कचरा येत आहे. जर १२५० टनांचे नविन प्रकल्प सुरू झाले तर रामटेकडी वसाहतीतील नागरीकांना रस्त्यावर चालणे अवघड होणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद होवून बेरोजगारीत वाढ होईल. हडपसर परिसरात दुर्गंधी व रोगराई वाढून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांच्या हितास बाधक असणारा नवीन कचरा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी पक्षा तर्फे देण्यात आला.

प्रश्न दिवसेंदिवस पेटत चालला आहे...
यापूर्वी महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी शिवसेना, हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समिती यांनी दोन मोठी जन आंदोलन केली. पालिकेत घटांनाद आंदोलन झाले. मात्र, जनतेचा विरोध डावलून प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू ठेवण्यात येणार असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष तसेच हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समिती तर्फे कचरा प्रकल्पा विरोधात जनजागृती सुरू केली आहे. अगोदरच या भागात महापालिकेचे चार प्रकल्प आहेत. त्यामुळे या प्रकल्पा विरोधात जनमत सत्ताधा-या विरोधात वळले आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजीत करू, असे अश्वासन दिले आहे. मात्र, ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत चालला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com