साथीच्या आजारांचे थैमान; रुग्णालये झाली फुल्ल

संदीप जगदाळे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

हडपसर (पुणे): डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड, ताप आणि सर्दी-खोकला आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत. सर्व खासगी रुग्णालये सध्या रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो गोरगरीब उपचार घेणा-या रूग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, आरोग्य विभाग झोपा काढत आहे का? अशा संतप्त प्रतिक्रीया नागरीकांमधून व्यक्त होत आहेत. याबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून या साथींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही ठोस उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

खासगी दवाखान्यात चिकुनगुनिया, डेंगी, मलेरिया, टायफॉईड, सर्दी, खोकला या आजारांवर उपचार घेणा-या रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या रूग्णालयांना चांगले दिवस आहेत. एकीकडे प्रशासन तुस्त तर रूग्ण त्रस्त अशी परिस्थिती हडपसरमध्ये पहावयाला मिळत आहे. महापालिकेच्या रूग्णालयात डॅाक्टर व कर्मचा-यांची संख्या कमी आहे. अनेक औषधे उपल्बध नसतात, अशा तक्रारी नागरिकांकडून वाढल्या आहेत.

याबाबत नागरिक चंद्रकात सत्ते म्हणाले, आम्ही महापालिकेला प्रामाणिकपणे कर भरतो, मग आम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा का नाहीत? या भागात पालिकेचे एकही मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटल का होवू शकत नाही? प्रशासन गोरगरिबांच्या लोकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहे. सर्वच प्रभागांत आजाराने थैमान घातले आहेत. प्रत्येक घरातील सदस्य आजारी असल्याचे दिसून येत आहे. आजारी पडलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात नेऊन रक्त तपासल्यानंतर डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदीं आजाराचे निदान होत आहे. रक्ताची तपासणी करण्याचे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून, परिसरातील प्रभागात स्वच्छता करणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न, नागरिकांत जनजागृती याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

याबाबत हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे मलेरिया इन्सपेक्टर अण्णा बांदल म्हणाले, ग्रामपंचायत हद्दीतील रूग्ण हडपसरमध्ये उपचारासाठी येतात. त्यामुळे साथ पसरते. झोपडपट्टयांपेत्रा बंगले, मोठया सोसायटीतील स्वीमींग टॅंक, टेरेसे, कुलर, पाण्याच्या टाकया, कुंडया, अर्धवट व पडीक बांधकामे यामध्ये साठलेल्या पाण्यामुळे डास उत्पत्ती अधिक होत आहे. संबधित ठिकाणी आम्ही किटकनाशक फवारतो तसेच दंड व नोटीसा देवून कारवाई करतो. मात्र, नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.

फुरसुंगी, देवाची उरूळी, साडेसतरा नळी, केशवनगर ही गावे पालिकेत समाविष्ट झाली. हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत ही गावे आहेत. त्यामुळे सर्वात मोठी हद्द असलेले हे कार्यालय आहे. आरोग्य विभागाकडे अगोदरच मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे किटकनाशक फवारणी करताना अनेक अडचणी येतात. या कार्यालयातील आरोग्य विभागाने नवीन ८० कर्मचारी मिळावेत, अशी विनंती वरिष्ट कार्यालयाकडे केली आहे. मात्र, पेरशा मनुष्यबळा अभावी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये किटकनाशक फवारणी झालेली नाही. तसेच नियमितपणे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे ना ग्रामपंचायत ना महापालिका या गावांकडे लक्ष देत आहे. त्यामुळे साथीचे आजार दिवसेंदिवस बळावत आहे, हि वस्तूस्थिती आहे.