स्कूल बसमधील मुलींची छेड का काढतो? हे विचारल्याने केला हल्ला

स्कूल बसमधील मुलींची छेड का काढतो? हे विचारल्याने केला हल्ला

हडपसर (पुणे): स्कूल बसमधील मुलींची छेड का काढतो याचा जाब विचारल्याने तीन तरूणांवर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल असून सर्व आरोपी फरार आहेत. ही घटना पंधरा नंबर येथे सोमवारी (ता. 20) रात्री पावणे नऊ वाजता घडली.

अनिकेत शिंदे व सोन्या घायाळ (रा. लोणी काळभोर) अशी दोन आरोपींची नावे असून, त्यांच्यासह त्यांचे तीन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी बसचालक अक्षय संतोष शेवाळे (वय २४ रा. शेवाळवाडी, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा चुलत्यांच्या स्कुल बसवर चालक आहे. लोणी काळभोरहून हडपसरला येत असे. आरोपी अनिकेत हा पंधरा दिवसांपूर्वी बसचा पाठलाग करून बसमधील मुलीची छेड करायचा व बसच्या आजूबाजूला गिरक्या मारायचा व दुचाकी रेस करून फिरायचा. त्यामुळे बस चालकाने त्याला थांबवून जाब विचारला होता. बसच्या मागे येऊ नको बस खाली येशील अशी समज दिली होती. त्यानंतर त्यांच्यातला वाद मिटला होता. पुन्हा सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसचालक अक्षय व त्याचा मित्र महेश शिंदे दुचाकीवरून हाडपसरच्या दिशेला येत होता. तेव्हा आरोपी अनिकेत त्याच्या मित्रासोबत तिथे आला आणि बसचालक अक्षयसोबत भांडणे सुरू केली. तेव्हा आरोपी अनिकेत व सोन्या तिथे आले व अक्षयसोबत भांडण सुरू केले. तेव्हा अक्षयचा मित्र मनोज व महेश या दोघांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. अनिकेत शिंदे व त्याच्या मित्रांनी अक्षय व त्याचे मित्र मनोज पवार व महेश भंडारी यांच्यावर धारदार शस्त्रानेवार केले व पळून गेले. यामध्ये मनोजला किरकोळ मार लागला आहे. महेश व अक्षय गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com