महिलेचा आकस्मित मृत्यू नसून खून झाल्याचे उघडकीस

संदीप जगदाळे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): फुरसुंगी येथे नवीन मुळा-मुठा कालव्यात मिळून आलेल्या अज्ञात पंचवीस वर्षाच्या महिलेचा आकस्मित मृत्यू झाला नसून, तिचा खून झाल्याचे छडा हडपसर पोलिसांनी लावला आहे.

बेदम मारहाण करून तिचा खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व आरोपी फरार असून खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांची तपास पथके आरोपींच्या मार्गावर असून लवकरच ते ताब्यात येतील, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

माधुरी पवार उर्फ शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथून वाहणा-या नवीन मुळा-मुठा कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेचा पाण्यात बुडून झाल्याचे निषपन्न झाले होते. त्यानंतर आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, महिलेच्या अंगावरील मारहाणीच्या जखमांवरून पोलिसांना हा आक्समित मृत्यू नसून खून असल्याचा संशय होता.

हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी हि (रा. सर्वे न. १७८, भोसले व्हिलेज, फुरसुंगी) येथील एका इमारतीच्या बांधकामावर काम करत होती. तेथेच आपली दोन मुले मोसीन शेख (वय ६) व मुसुद्दीन शेख वय (४) यांच्या सोबत पत्र्याच्या शेड मध्ये राहत होती. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे महिलेची ओळख पटली. तपास करत असताना महिलेच्या मुलांकडून मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी आरोपी शांताबाई व रमेश काका उर्फ बिल्डर व धर्मा काका हे महिलेच्या घरी आले होते. तिघांनी जबरदस्तीने आईला रिक्षात बसवून कोठेतरी नले. तर मुलांना हुल्लाळकर मावशीकडे सोडले. त्यानंतर मुलांची आई पून्हा घरी परतलीच नाही. तपासात मिळालेल्या धागेदो-यांनुसार खात्री झाल्यानंतर तिघांविरोधात महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.