सोनपापडीत हाडे

haldiram
haldiram

भोर (पुणे): बाजारात मोठे नाव असलेल्या एका कंपनीच्या सोनपापडीमध्ये चक्क हाडाचे तुकडे आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रॅंडेड वस्तूही खाण्यासाठी योग्य आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

वेनवडी (ता. भोर) येथील नंदकुमार नेवसे यांनी रविवारी (ता. १९) भोर शहरातील चौपाटी येथील एका स्वीट होममधून सोनपापडी खरेदी केली. यासाठी चॉकलेट फ्लेवरच्या २५० ग्रॅमच्या सोनपापडीसाठी त्यांनी ६५ रुपये रोख दिले. घरी गेल्यावर मुलांनी पॅकेट फोडले, तर त्यामध्ये हाडांचे दोन तुकडे आढळून आले. सोनपापडीत हाडाचे तुकडे पाहिल्यानंतर त्यास उलटी झाली. नेवसे यांनी दुकानदाराला विचारणा केल्यावर त्यांना आम्ही हा माल घरी बनवत नाही, कंपनीकडून पॅंकिंग आलेले तुम्हाला दिले, असे सांगून हात वर केले. याबाबत दुकानाचे मालक यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही बारामतीच्या एका डिस्ट्रीब्युटरकडून माल खरेदी केला असल्याचे सांगितले. मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर शासनाने कडक कारवाई करावी आणि अन्न व औषध प्रशासनाने नियमितपणे तपासणी करावी, अशी मागणी नदंकुमार नेवसे यांनी केली. याबाबत शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com