दिव्यांग मुले आकाश कंदील बनविण्यात मग्न...

संदीप जगदाळे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेतील मुले दीपावली सण जवळ आल्याने आकर्षक आकाश कंदील, पणत्या आणि दीपावली भेटकार्ड बनविण्यात दंग आहेत. विदयार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंना विविध कंपन्यातून मागणी येत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचा अभ्यास सांभाळून या मुलांचे हात कला-कुसरीच्या वस्तू तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.

विदयार्थीनी आशा धर्मशाळा म्हणाली, 'आम्ही दिव्यांग आहोत. मात्र, प्रत्येकामध्ये काही तरी सुप्त गुण दडलेले आहेत. ते ओळखून संस्था व शिक्षक प्रत्येकाला आवडत्या कलेत प्राविण्य मिळविण्यासाठी संधी व प्रशिक्षण देते. दीपावलीच्या वस्तू बनविताना आम्हाला सर्वांनाच वेगळा आनंद मिळतो. आम्हाला संस्थेत पुस्तकी शिक्षणासोबत संगणक प्रशिक्षण, शिवणकाम, ज्वेलरी तयार करणे, शोभेच्या वस्तू तयार करणे, शिवणकाम, कारपेंटर, मोबाईल रिपेअरिंग, हार्डवेअर रिपेअरिंग यासारखे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अनेक माजी विदयार्थ्यांचे व्यवसाय अथवा नोकरीच्या माध्यमातून पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे आम्ही आवडीनुसार कोर्स निवडतो व त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.'

मुख्याध्यापक शिवाणी सुतार म्हणाल्या, 'विशेष गरजा असलेल्या मुलांमधील कलागुणांना संधी देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्था विदयार्थ्यांना शालेय शिक्षणबरोबरच विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवित असते. शाळेत मुलांना हस्तकला, भरतकाम आणि चित्रकलेचे शिक्षण दिले जाते.'

संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे म्हणाले, 'संस्थेचे अनेक हितचिंतक दरवर्षी मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेवून मुलांना प्रोत्साहन देतात. मुलांना कलेची आवड निर्माण निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ना नफा ना तोटा या तत्वावर मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. त्यामुळे मुले या वस्तू उत्साहाने तयार करतात.'

Web Title: pune news handicap children Divyaang children make the lantern