समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. थोरात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्‍चंद्र थोरात यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात होणार आहे. 

संमेलनाची घोषणा कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मंगळवारी केली. "समीक्षा, सिद्धांत आणि व्यवहार' असे संमेलनाचे सूत्र असणार आहे. याचे उद्‌घाटन साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. 

प्रा. जोशी म्हणाले, ""अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात गंभीरपणे साहित्यचर्चा होत नाही, अशी अनेक सारस्वतांची खंत होती. त्यामुळे साहित्य परिषदेने समीक्षा संमेलन घेण्यास सुरवात केली आहे.'' 

संमेलनात "समीक्षेची संकल्पना आणि कार्य' या विषयावर प्रा. रेखा साने-इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होईल. त्यात तृप्ती करीकट्टी, नितीन जरंडीकर सहभागी होणार आहेत. "समीक्षा आणि आंतरविद्याशाखीयता' या विषयावर अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार असून त्यात राहुल कोसंबी, उदय रोटे सहभागी होतील. त्यानंतर प्रा. संतोष पवार आणि डॉ. प्रभंजन चव्हाण हे शोधनिबंध सादर करतील. 

"समीक्षा व्यवहाराचे विविध पैलू' या चर्चासत्रात वंदना भागवत, चिन्मय धारूरकर, प्रवीण बांदेकर, कैलास जोशी; तर "समकालीन मराठी समीक्षा' या चर्चासत्रात प्रा. अविनाश सप्रे, प्रशांत धांडे, प्रा. रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत. 

Web Title: pune news harishchandra thorat