हेलिकॉप्टरची भुरळ

Helicopter
Helicopter

पुणे - मुंबई-नाशिकला जायचं असेल तर तुम्ही काय करता? रेल्वे, कॅब किंवा शिवनेरीचे बुकिंग? या तीनव्यतिरिक्त हेलिकॉप्टर अथवा चार्टरचा चौथा पर्याय तुम्हाला कोणी दिला तर? होय! या चौथ्या पर्यायाची भुरळ आता पुणेकरांना पडली आहे. हेलिकॉप्टरचा वापर जवळपासच्या शहरात कामानिमित्त जाण्यासाठी करणाऱ्या पुणेकरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

 राजकीय, उद्योग, शिक्षण, आरोग्य, उत्पादन आदी विविध क्षेत्रांतून खासगी हेलिकॉप्टर अथवा फ्लाइट भाडेतत्त्वावर घेण्याचे वाढते प्रमाण
 अर्ध्या तासासाठी ५०-६० हजार रुपयांपासून त्यासाठीची पॅकेजेस उपलब्ध
 किती वेळ लागणार, किती लोक आहेत त्यानुसार दर 
 हौशी प्रवाशांसाठीही १२ हजार रुपयांपासून हेलिकॉप्टर राइड उपलब्ध 
 आरक्षण झाल्यावर ‘एटीसी’कडून (एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल) परवानगी घेऊन हेलिकॉप्टर-चार्टरची उड्डाणे
 शहरात चार-पाचपेक्षा जास्त कंपन्या, तर मुंबई-दिल्लीतून हा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या एजंटांचाही सुळसुळाट 
 खासगी विमाने असणारे ८-१० उद्योग समूह शहरात कार्यरत 

लग्न, उत्सवासाठी विचारणा
 लग्न समारंभात नवरा-नवरीसाठी
 वाढदिवस, साखरपुड्यासाठी 
 शिवजयंती, गणेशोत्सव, आंबेडकर जयंतीसाठी पुष्पवृष्टी करण्यासाठी 
 देवदर्शनासाठी 

मागणी कोठून?
 पुणे, पिंपरी-चिंचवड, भोर, मंचर, आंबेगाव, मुळशी; तसेच कोल्हापूर, सांगली.
 येथे जाण्यासाठी हवे हेलिकॉप्टर अथवा चार्टर 
 मुंबई, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, बारामती
 राज्याबाहेर चेन्नई, बंगळूर, अहमदाबाद 
 कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, दापोलीमध्ये हेलिपॅड झाल्यास मागणी जास्त 
 एअर ॲम्ब्युलन्सलाही मागणी, नियम शिथिल झाल्यास, एरिअल फोटोग्राफीसाठीही सुविधा शक्‍य 

मुंबई-नाशिकला रस्त्याने पोचण्यासाठी चार तास घालविणे किंवा विमानाची वाट पाहणे, यापेक्षा हेलिकॉप्टर अवघ्या अर्ध्या तासात पोचत असल्यामुळे उद्योगसमूहांचेही वरिष्ठ अधिकारी त्याचा वापर करू लागले आहेत. त्यासाठी अगदी ५० हजारांपासून दोन लाखांपर्यंत खर्च येतो. कामाची निकड लक्षात घेता हा खर्च त्यांना फार वाटत नाही. लग्न समारंभ, आंबेडकर जयंतीसारख्या कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याचे प्रमाण निश्‍चितच वाढू लागले आहे.
-  महेश घोरपडे, संचालक, क्‍लब एलिअर 

पुण्याचा औद्योगिक विस्तार वाढला आहे. त्यामुळे राज्यांतर्गत आणि कर्नाटक, गुजरातमधील शहरांत हेलिकॉप्टरने जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात औद्योगिक, आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरसाठी केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातूनही मागणी वाढू लागली आहे.
- शैलेंद्र देवकुळे, मांडके एव्हिएशन

‘चार्टर’लाही सुगीचे दिवस 
शिर्के एव्हिएशनचे दारीयस बूचा म्हणाले, ‘‘चार्टर फ्लाइटमध्येही (खासगी छोटे विमान) आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दोन-तीन ते अगदी आठ आसन क्षमतेचे चार्टरही पुण्यात उपलब्ध झाले आहे. एखाद्या ग्रुपच्या गरजेनुसार त्यांचा वापर होऊ लागला आहे. मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, शिर्डीसाठीही त्याचे आरक्षण होत आहे. त्याशिवाय राज्याच्या बाहेरील प्रमुख शहरांसाठीही मागणी वाढू लागली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com