पदपथांवरील वाहनांमुळे पादचाऱ्यांना अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पुणे - डेक्कन जिमखान्यासमोरील पदपथांवर वाहने उभी राहत असल्याने पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर भुयारी मार्ग असून, त्याच्या प्रवेशद्वारावरच भाजी मंडई थाटण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पदपथावरील अनधिकृत वाहने व भाजी मंडईवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

पुणे - डेक्कन जिमखान्यासमोरील पदपथांवर वाहने उभी राहत असल्याने पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर भुयारी मार्ग असून, त्याच्या प्रवेशद्वारावरच भाजी मंडई थाटण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पदपथावरील अनधिकृत वाहने व भाजी मंडईवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

डेक्कन जिमखान्यासमोर क्‍लबमध्ये येणारी काही वाहने, याच परिसरात खरेदीसाठी येणारे नागरिक वाहने उभी करून जातात. या ठिकाणी कुठेही पार्किंगचा फलक नसताना वाहने उभी केली जातात. याचबरोबर, अनधिकृतपणे खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या केलेल्या असतात. या परिसरातील प्रभात, भांडारकर रस्ता अरुंद असून, ते फर्ग्युसन रस्त्याला मिळत आहेत. या रस्त्याला वाहनांची सतत वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे अनधिकृत वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी.

प्रभात रस्ता व भांडारकर रस्त्यालगत असणाऱ्या लहान गल्ल्या अतिशय अरुंद आहेत. या परिसरात दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. डेक्कन जिमखान्यासमोर सतत बेकायदा वाहने लावली जातात. मात्र, अशा वाहनांवर पोलिस कारवाई करत नाहीत.
- राजेश शेंडे, अध्यक्ष, जनहित फाउंडेशन

गरवारे चौकाजवळ असलेल्या रस्त्यावरील भाजी मंडईचा परिसर महापालिकेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंग व भाजी मंडई यांच्यासाठी उपाययोजना करावी. याचबरोबर या परिसरातील गल्ल्यांमध्ये वाहतूक विभागाने ‘नो पार्किंग झोन’ करणे आवश्‍यक आहे. भाजी मंडई व पार्किंगचा प्रश्‍न सुटल्यास पादचारी व वाहनचालक सुरळीतपणे प्रवास करू शकतील.
- शिरीष आपटे, शिवसेना, शहर समन्वयक

पुणे

पिंपरी - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना...

07.21 PM

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हडपसर प्रभाग...

07.15 PM

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM