पीएमआरडीएच्या ‘हायपरलूप’ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या 

पीएमआरडीएच्या ‘हायपरलूप’ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या 

पुणे - पुणे-मुंबई दरम्यान अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी अवघ्या वीस मिनिटांमध्ये १०८० प्रति ताशी किलोमीटर वेगाने जाणारी ‘हायपरलूप’ वाहतूक सेवा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (पीएमआरडीए) आणि लॉस एंजलिस येथील ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ कंपनीसोबतचा ‘सामंजस्य करार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला. 

या वेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते आणि ‘ग्लोबल फिल्ड, व्हर्जिन हायपरलुप वन’चे वरिष्ठ उपाध्यक्ष निक अर्ले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार, पुणे-मुंबई विभागातील मार्गांचे ‘पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल’ (प्री-फिजीब्लिटी स्टडी) तयार करून ‘हायपरलूप’ आधारित प्रवासी वाहतूक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यात पीएमआरडीए व हायपरलूप वन कडून संयुक्तपणे प्राथमिक अभ्यास केला जाईल. करारानंतर ६ आठवड्यांमध्ये प्रवासी वाहतूक आणि इतर माहिती प्राप्त करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ राज्य सरकारच्या तसेच महापालिकांच्या सर्व विभागांशी समन्वय साधेल. त्याचा ‘प्राथमिक अभ्यास अहवाल मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाईल. जागतिक स्तरावर ‘हायपरलूप’  चाचणीच्या पातळीवर आहे. 

‘हायपरलूपने ‘उत्तर लास वेगास, एनव्ही' येथे ‘हायपरलूप चाचणी केंद्र’ विकसित करण्यात आले आहे. सध्या ‘हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित ‘ट्रांजिट प्रोजेक्‍ट’ नेदरलॅंड्‌समध्ये (शिफोल विमानतळ कनेक्‍टर), अबू धाबी ते दुबई (इंटरसिटी कनेक्‍टर) आणि ‘स्टॉकहोम ते हेलसिंकी’ (रिजनल नेटवर्क) येथे सुरू आहेत. 

‘हायपरलूप' म्हणजे नेमके आहे तरी काय  
‘हायपरलूप’मध्ये निर्वात पोकळीतील विद्युत-चुंबकीय प्रणोदकांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. अत्यंत जलद व थेट अशा वाहतुकीचा प्रकार असून ताशी १०८० किलोमीटर असा त्याचा वेग असणार आहे.  त्यामुळे भविष्यात अवघ्या २० मिनिटांमध्ये पुणे ते मुंबई अंतर कापणे सहज शक्‍य होणार आहे. 

हायपरलूप वाहतूक यंत्रणा ही एकविसाव्या शतकातील नागरिकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विकसित होणाऱ्या द्रुतगतीच्या वाहतूक यंत्रणेचा भाग आहे. जलद सार्वजनिक वाहतुकीचे व्यवहार्य साधन बनण्यासाठी उच्च घनतेची वाहतूक आवश्‍यक आहे, जी पुणे आणि मुंबई शहरात उपलब्ध आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे महानगरे जोडल्यास प्रवास वेळ २० मिनिटांपेक्षा कमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे क्षेत्रातील दोन कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येला फायदा होईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com