इंदापूर - वाळूमाफिया विरोधात जोरदार कारवाई

action-against-sand-mafia
action-against-sand-mafia

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीच्या पात्रामध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियाच्या विरोधात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जोरदार कारवाईची मोहिम उघडली असून मंगळवार(ता.२१) रोजी रात्री वाळूच्या सहा ट्रेलर व एका टिपरवरती कारवाई करुन सुमारे चार लाख रुपयांची वाळू जप्त केली. 

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील खोरोची, निमसाखर, निरवांगी, कुरवाली, जांब, उद्घट, तावशी परीसरामध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातला होता. दररोज हजारो ब्राझ वाळूची चोरी होत होती.दिवसाढवळ्या होणाऱ्या वाळू चोरीमुळे महसूल विभागाकडे नागरिक बोट दाखवू लागले होते.  मंगळवार(ता.२१) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वत: नीरा नदीकाठी छापे टाकण्यास सुरवात केली. चिखली, कुरवली जांब  व तावशी परीसरामध्ये छापे टाकून सहा ट्राॅली व एक टिपर जप्त करण्यात आला आहे. सुमारे साडेअकरा ब्रास वाळू असून वाळूमाफियांना सुमारे चार लाख रुपये दंड करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

इंदापूर तालुक्यामध्ये धडक कारवाई करणार -पाटील
इंदापूर तालुक्यातील उजनी, नीरा - भीमा नदीच्या परीसरामध्ये वाळूचोरीचे ठिकाणांची पाहणी केली असून यापुढे वाळूमाफियावर कडक कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 वाळूमाफियांना  मोका लावा 
वाळूमाफियांनी इंदापूर तालुक्यातील  रस्त्याची वाट लावली  अाहे.  दरराेज हजारो लाखो रुपयांची  वाळू चोरी केली जात असून गावोगावी वाळू माफियांची मुुजोरी वाढली असुन वाळूचोरीचा दंड करण्याबरोबर वाळू चोरीगुन्हे दाखल करुन मोका लावण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकामधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com