वीर पासलकरांवर इतिहासात अन्याय - विकास पासलकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - ‘‘शिवरायांचे स्वराज्य उभे करण्यात त्यांचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. मात्र, त्यांचा पराक्रम, शौर्य आणि त्याग यांना इतिहासाने न्याय दिला नाही. त्यांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी पासलकर यांची जयंती, पुण्यतिथी तिथीनुसार न करता, तारखेनुसार साजरी केली जाईल,’’ अशी माहिती वीर बाजी पासलकर स्मारक मंडळाचे कार्याध्यक्ष विकास पासलकर यांनी दिली.

वीर बाजी पासलकर यांच्या ३६८ व्या पुण्यतिथीनिमित्त पानशेत येथे आयोजित अभिवादन सभेत पासलकर यांच्या पुतळ्यास वेल्हा तालुक्‍याच्या सभापती सीमा राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पासलकर, राजा पासलकर, बाळासाहेब पासलकर, नाना राऊत उपस्थित होते.