राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला बसणार एक लाख विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू असून, सुमारे एक लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतील, असा अंदाज राज्य परीक्षा परिषदेने व्यक्त केला आहे. ही परीक्षा पाच नोव्हेंबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे, असेही परिषदेने स्पष्ट केले.

परिषदेच्या उपायुक्त आशा उबाळे म्हणाल्या, 'प्रज्ञाशोध परीक्षा राष्ट्रीय असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थी, शिक्षणाधिकारी यांच्या नोंदणीचे काम पूर्ण करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या शाळांची माहिती सरल प्रणालीमध्ये उपलब्ध असल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये कोणतीही अडचण नाही; मात्र आर्मी पब्लिक स्कूल, जवाहर विद्यालय या शाळांनी सरल प्रणालीत माहिती भरली नसल्याने थोडी अडचण निर्माण झाली होती; मात्र या शाळांना विद्यार्थ्यांची माहिती मॅन्युअल पद्धतीने भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.''

'प्रज्ञाशोध परीक्षा पाच नोव्हेंबर रोजी होत असल्याने नोंदणीसाठी अद्याप महिनाभराचा वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासंबंधी कोणतीही समस्या

निर्माण होणार नाही. सुमारे एक लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे,'' असे उबाळे यांनी सांगितले. परीक्षेची तारीख पुढे ढकलणार असल्याच्या अफवांबाबत विचारले असता उबाळे म्हणाल्या, ""परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होणार असल्याने त्याची तारीख कोणत्याही स्थितीत बदलली जाणार नाही.''

Web Title: pune news Intelligence exam 1 lakh student