आरोग्यप्रमुख, इतर पदांसाठी महापालिकेत उद्या मुलाखती

आरोग्यप्रमुख, इतर पदांसाठी महापालिकेत उद्या मुलाखती

पुणे - महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांसह 18 पदांसाठी शनिवारी (ता. 18) आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे मुलाखती होणार आहेत. सुमारे 90 डॉक्‍टरांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. 

महापालिकेचे आरोग्यप्रमुखपद गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रिक्त आहे. या पदासाठी आठ जणांचे अर्ज आले आहेत, तर वैद्यकीय खात्यातील तज्ज्ञांच्या विविध पदांचीही जाहिरात प्रशासनाने काढली होती. तिलाही चांगली प्रतिसाद मिळाला असून, त्यासाठी 82 अर्ज आले आहेत. आरोग्य विभागात गेल्या चार वर्षांपासून कायम असलेल्या; परंतु रिक्त झालेल्या पदांवर भरती झालेली नव्हती. महापालिकेने राज्य सरकारची विशेष परवानगी काढल्यानंतर ही पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत सर्वसाधारण सभेत वारंवार चर्चा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आता रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com