लोकन्यायालयात ज्येष्ठ महिलेला न्याय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुलाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ८ लाख रुपये देण्याचा आदेश

पुणे - तरुण मुलाचा झालेला मृत्यू आणि कर्करोगासारख्या दुर्धर आजार असलेल्या एका ज्येष्ठ महिलेला लोकन्यायालयात दिलासा मिळाला. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाखल केलेल्या दाव्यात विमा कंपनीने तिला ८ लाख ३५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दिला.  

दशरथ सिदप्पा जमादार असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. टॅंकरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१४ मध्ये हा अपघात झाला होता. त्याची आई लक्ष्मी सिदप्पा जमादार यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे टॅंकर चालक आणि संबंधित विमा कंपनीविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. जमादार या कर्करोगाने आजारी असून, कमवत्या मुलाचे अपघाती निधन झाल्याने त्यांचा आधार हरवला आहे. 

त्यांचा मुलगा वाहनचालक म्हणून काम करत होता. त्यामुळे 
जमादार यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांच्यातर्फे ॲड. सुनीता नवले यांनी न्यायाधिकरणाकडे केली होती. हा दावा लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आला होता. येथे तडजोड झाल्याने दावा दाखल केल्यानंतर एका वर्षाच्या आतच न्याय मिळण्यास मदत झाली. 

१०८ वर्षांच्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी भरपाई कोंडाबाई ज्ञानदेव पानवलकर या १०८ वर्षाच्या महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळाली. यवत येथे पायी जात असताना एका मोटारीची त्यांना धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला होता. वय जास्त असले, तरी त्या वैयक्तिक कामे करत होत्या, त्यांची प्रकृती चांगली होती, असे विविध मुद्दे त्यांच्या वारसदारांच्या वकिलांनी न्यायाधिकरणासमोर मांडले होते. हा दावादेखील तडजोडीने सोडविण्यात आला. त्यांच्या वारसांना एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय लोकन्यायालयात झाला.