‘खडकवासला’वर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - राज्यातील धरणांवर पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धरणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, संरक्षक भिंत उभारणे आणि गस्तीसाठी पोलिसांची संख्या वाढविणे, याबाबत शुक्रवारी विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. या वेळी खडकवासला धरण साखळीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चर्चा झाली. 

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रश्नोत्तर सत्रामध्ये सदस्य अनंत गाडगीळ यांनी हा तारांकित प्रश्न विचारला. खडकवासला धरण साखळीतील धरणांवर संरक्षक भिंत उभारणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व गस्तीवरील पोलिसांची संख्या वाढवावी. तसेच राज्यातील इतर धरणांवरही सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 

या प्रश्‍नाला उत्तर देताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘‘पावसाळ्यामध्ये धरणांवर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भुशी, कोयना, खडकवासलासह सर्व धरणांवर नागरिकांचा थेट पाण्याचा संपर्क होणार नाही, यासाठी संरक्षक भिंत उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व पोलिसांची संख्या वाढविण्यासंदर्भात गृह विभाग व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील.’’