नवरात्रीतील कौरवपांडवाच्या खेळाची परंपरा...

सुदाम बिडकर
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पारगाव (पुणे): खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरात नवरात्रीच्या दिवसामध्ये पारंपारीक पध्दतीने घोंगडीवर बसून सोंगट्यांचा खेळ खेळण्यासाठी परिसरातील जेष्ठ नागरिक एकत्र येत आहेत. शेकडो वर्षाची ही परंपरा येथील नागरीकांनीही आजही जतन केली असून, याला कौरव पांडवांचा खेळ या नावानेही संबोधले जाते.

नवरात्रीमध्ये पारंपारिक उत्सवाबरोबरच आपल्याकडे अलिकडच्या काही वर्षात दांडीया तसेच गरबाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. खडकवाडी येथे मात्र शेकडो वर्षा पासून चालत आलेल्या परंपरेनुसार नवरात्रीच्या नऊ रात्री येथील पुरातन भैरवनाथ मंदिरामध्ये सोंगट्याचा खेळ रंगत आहे. हा खेळ सांघिक पध्दतीने खेळला जात असून, खेळ जर रंगत गेला तर रात्र कधी सरुन जाते व पहाट उजाडते हे खेळणारालाही समजत नाही इतके ते खेळात तल्लीन होऊन जातात.

या खेळात सहभागी होण्यासाठी परिसरातील लोणी, धामणी, रानमळा, वाळुंजनगर, पोंदेवाडी व खडकवाडी या गावातील या खेळाची आवड असलेले जेष्ठ नागरीक आवर्जुन उपस्थित राहुन या खेळात सहभाग घेतात हा खेळ वर्षात फक्त नवरात्रीमध्येच खेळला जातो या खेळास कौरव पांडवांचा खेळ या नावानेही संबोधले जाते, अशी माहिती सरपंच अनिल डोके, नाथा सुक्रे, सुरेश नाना सुक्रे यांनी दिली.

Web Title: pune news khadkwadi navratri tradition of the game of Kaurav pandav