पुढील महिन्यात ‘खाऊ गल्ली सीझन ५’

पुढील महिन्यात ‘खाऊ गल्ली सीझन ५’

पुणे - ‘सकाळ’तर्फे येत्या डिसेंबर महिन्यात कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये ‘खाऊगल्ली’चे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध प्रकारचे आणि ठिकाणांचे खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. साउथ इंडियन, पंजाबी, पिठल- भाकरी, वांग्याची भाजी, भजी, वडापाव, महाराष्ट्रीयन स्नॅक्‍स, सॅंडविच, चायनीज, तंदूर स्पेशल, सी फूड, मालवणी, चाट कॉर्नर, चिकन, फिश स्नॅक्‍स, व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी अशा प्रकारांमधल्या असंख्य खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश असेल. 

अगदी नाश्‍त्याच्या छोट्या-छोट्या खाद्यपदार्थांपासून ते जेवणापर्यंत प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये तुमचा हातखंडा असेल, तर तुम्ही नक्कीच तुमचे नशीब आजमावू शकता. नव्याने या व्यवसायात येऊ पाहणारे व नामवंत व्यावसायिक यांना आपल्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकर खवय्यांना द्यायची असेल तर लवकरच आपल्या स्टॉलचे बुकिंग करा. या माध्यमातून तुम्ही पुणेकर खवय्यांपर्यंत सहज पोचू शकता. खाऊगल्लीचे आयोजन २३, २४ व २५ डिसेंबरला महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले आहे. ज्यांना यामध्ये स्टॉल लावण्याची इच्छा आहे, असे प्रत्येक जण यात सहभागी होऊ शकतात. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी, नावनोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी : ९१३०००६९१३, ९६८९००३७०९ आणि ९५५२११८७१० या क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

सकाळ ‘खाऊगल्ली सीझन ५’
कोठे     -    महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर 
केव्हा     -     २३ ते २५ डिसेंबर 
कधी     -     सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत 
संपर्क    -     ९१३०००६९१३, ९६८९००३७०९ आणि ९५५२११८७१० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com