"स्मार्ट सिटी'द्वारे जीवनमान सुधारणार - कुणाल कुमार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - "" कमी स्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त चांगले काम करणे व भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आधीपासूनच सावधगिरी बाळगत त्यानुसार विकासकामांची आखणी करणे म्हणजे "स्मार्ट' कार्यपद्धती होय. शहरात "स्मार्ट सिटी' प्रकल्पातून नेमकी हीच गोष्ट साध्य केली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे आगामी काळात विकासकामे करून नागरिकांचे जीवनमान सुधारणार आहे,'' असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले. 

"सकाळ'च्या "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे(यिन) आयोजित "यिन यूथ समर समिट 2017'चे रविवारी उद्‌घाटन झाले. या वेळी कुणाल कुमार यांनी समिटमध्ये सहभागी युवकांशी संवाद साधत "स्मार्ट सिटी' प्रकल्पाबाबत विविध गोष्टींची महिती दिली. 

या वेळी "सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील आणि "यिन'चे प्रमुख तेजस गुजराथी उपस्थित होते. 

कुणाल कुमार म्हणाले, ""स्मार्ट सिटी प्रकल्प हा महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, आर्थिक विकास आणि शाश्वत विकास करणे ही प्रमुख उद्दिष्टे असतील.'' 
सुशासन, प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप, करिअरच्या नव्या संधी अशा विविध विषयांवरील तरुणाईच्या प्रश्‍नांना कुणाल कुमार यांनी उत्तरे दिली. 

प्रशासनातील निष्क्रियेतेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना कुमार म्हणाले, ""प्रशासनामध्ये अधिक चांगले काम केले, म्हणून कुणाला "इन्सेंटिव्ह' दिले जात नाहीत. एखाद्या अधिकाऱ्याने चांगले काम केले, नाही केले किंवा चुकीचे काम केले, तरी त्याला एकसारखेच मानधन मिळते. याउलट चांगले काम करताना त्या अधिकाऱ्याकडून छोटीसी जरी चूक झाली, तर तिच्याबाबत जास्त बोलले जाते. पण अनेक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे प्रशासनाला सरसकट निष्क्रिय म्हणणे योग्य नाही.'' 

चांगल्या कामासाठीचा हस्तक्षेप स्वीकारा - आयुक्त 
राजकारणात प्रशासनाचा हस्तक्षेप होतो का, याबाबत कुणाल कुमार म्हणाले, ""आपल्याला निवडून दिलेल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते. त्यासाठी ते प्रशासनाकडे पाठपुरावा करतात; परंतु काही बाबतीत त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे शक्‍य होत नाही. अशा वेळी प्रशासकीय अडथळे सांगितल्यास ते समजून घेतात. काही वेळा त्यांच्याकडून हस्तक्षेप होतो; परंतु हस्तक्षेप चांगल्या गोष्टींसाठी होत असेल, तर प्रशासनानेदेखील तो आनंदाने स्वीकारावा.