लहुजी शक्ती सेनेतर्फे पुणे ते नागपूर पदयात्रा

लहुजी शक्ती सेनेतर्फे पुणे ते नागपूर पदयात्रा
लहुजी शक्ती सेनेतर्फे पुणे ते नागपूर पदयात्रा

पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारीवर्गावर कारवाई करावी आणि मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेतर्फे आज (शुक्रवार) पुणे ते नागपुर पदयात्रा काढण्यात आली. गंज पेठेतील क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम येथून या पदयात्रेस प्रारंभ झाला.

सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, मातंग विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागले, नगरसेवक अविनाश बागवे,  सोमनाथ कांबले, सचिन जोगदंड, भावेश कसबे, आशा आवले आदी उपस्थित होते.

कसबे म्हणाले, "आघाडी सरकार व युती सरकारने मातंग समाजावर कायम अन्याय केला आहे. समाजाचे प्रश्न माहित असूनही ते सोडविण्यासाठी गांभिर्याने पाहिले नाही. स्वतंत्र आरक्षणाबरोबरच समाजाचे असंख्य प्रश्न आहेत. ते सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अनेकदा समाजातील नागरीकांना आपल्या न्याय हक्कासाठी लाठया-काठया खाव्या लागल्या आहेत. लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामात अधिकारीवर्गाने दिरगाई केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. समाजाचे प्रश्न सोडवावेत, यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com