खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

भाऊ म्हसाळकर
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

हुबळी एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे - खंडाळ्याजवळ मंकीहिलजवळ हुबळी-कुर्ला दरम्यान धावणाऱ्या हुबळी एक्स्प्रेसवर आज (सोमवार) पहाटे दरड कोसळल्याने तीन प्रवासी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मंकिहिल-ठाकूरवाडी दरम्यान गाडीच्या एस 6 बोगीवर दरड कोसळली. दरड डब्याचे छत फाडून आत आल्याने 3 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना कर्जतला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरड कोसळूनही गाडी कर्जतपर्यंत तशीच नेण्यात आले. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु असून, सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत.

पुणे

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM