"लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' आज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे -  हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाच्या आठवणी जागवणाऱ्या सदाबहार गाण्यांचा "लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. "रोटरी क्‍लब ऑफ पूना वेस्ट'ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून जमा होणाऱ्या निधीमधून क्‍लबच्या साक्षरता प्रकल्पाचा भाग असणाऱ्या शाळांच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाला मदत होणार आहे. "सकाळ माध्यम समूह' या लाइव्ह शोसाठी माध्यम प्रायोजक आहे. 

संगीतकार प्यारेलाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात साहिर लुधीयानवी, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी अशा नावाजलेल्या सगळ्याच गीतकारांची गाणी सादर केली जाणार आहेत. सेंथिल कुमार (बंगळूरू), मिष्टू वर्धन (कोलकता), संपदा गोस्वामी (मुंबई) यांच्यासह मधुरा दातार, अली हुसेन, श्रीकांत कुलकर्णी, मकरंद पाटणकर हे पुण्यातील गायक कलाकार, तसेच प्यारेलाल यांच्याबरोबर अनेक मूळ गाण्यांना साथ करणारे इव्हान मन्स, सुरेश यादव, शामराज अशा वादक कलाकारांसह नरेंद्र सालस्कर, अरविंद हसबनीस असे वादक कलाकार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

या कार्यक्रमातून पुण्याच्या परिसरातील 100 ग्रामीण शाळांचा सर्वांगीण विकास आणि शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींमधील तफावत दूर करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या प्रकल्पासाठी निधी उभारला जाणार आहे. 
- विश्‍वास सप्रे, अध्यक्ष, रोटरी क्‍लब ऑफ पूना वेस्ट 

"लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' 
शुक्रवार, ता. 15 
सायं 7 ते रात्री 10 
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेटजवळ