पुणे-मुंबई महामार्गावर पावणेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त

गणेश बोरुडे
बुधवार, 21 जून 2017

तळेगाव स्टेशन (पुणे) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी दरम्यान चोरटी वाहतूक करणार्या वाहनांच्या तपासणी दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर साते हद्दीत पकडलेल्या तस्करांकडून पावणेतीन लाखांच्या परराज्यातील दारुचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

तळेगाव स्टेशन (पुणे) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी दरम्यान चोरटी वाहतूक करणार्या वाहनांच्या तपासणी दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर साते हद्दीत पकडलेल्या तस्करांकडून पावणेतीन लाखांच्या परराज्यातील दारुचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

मंगळवारी (ता. 20) मुंबई-पुणे महामार्गावर साते हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिपक परब आणि उपनिरीक्षक संजय सराफ यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत होते. रिलायन्स पंपाजवळ एक मारुती कार एमएच-04 डब्ल्यू-811 ची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचे परराज्यातील विक्रीसाठीचे 10 बॉक्स (480) बाटल्या आढळून आल्या. पथकाने ताब्यात घेतलेल्या 2 आरोपींची सखोल तपासणी केली असता, कामशेतजवळील येवलेवाडी येथील दर्पण सोसायटीमधील आरोपीने भाड्याने घेतलेल्या घरामध्ये समान मद्याचे आणखी 12 बॉक्सचा (672) बाटल्या) साठा उघडकीस आला. पथकाने कारसह 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल आणि आरोपींना अटक केली. अक्षय भरत ननावरे (21, येवलेवाडी, ता. मावळ, पुणे) आणि प्रदीप शत्रुघ्न साबळे (22, येवलेवाडी, ता. मावळ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, आज (बुधवार) वडगाव मावळ न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता 3 दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उत्पादन शुल्क विभागाचे नरेंद्र होलमुखे, रविंद्र भुमकर, अतुल बारंगुळे, प्रमोद पालवे, संतोष गायकवाड, शिवाजी गळवे आदींच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

पुणे

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली...

08.48 AM

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM