लोहगाव विमानतळावर अठरा लाखांचे सोने जप्त 

लोहगाव विमानतळावर अठरा लाखांचे सोने जप्त 

पुणे - दुबई येथून तस्करी करून आणलेले सतरा लाख 87 हजार रुपये किमतीचे सहाशे ग्रॅम सोने पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आले. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. तस्करांकडून हे सोने बेबी डायपरमधून लपवून आणले जात होते. 

दुबईहून आलेले स्पाइस जेटचे विमान लोहगाव येथील विमानतळावर रविवारी पहाटे उतरले. सीमा शुल्क विभागाकडून प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. त्या वेळी एका प्रवाशाकडे असलेल्या बेबी डायपरबाबत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या प्रेस बटनांमध्ये दोन-तीन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंग लावलेल्या होत्या. त्या ओळखले जाऊ नयेत म्हणून त्यावर रेडियमचे कोटिंग केले होते. बॅगमधील एकूण 48 बेबी डायपरमधून अधिकाऱ्यांना दोन ते तीन ग्रॅमच्या 288 सोन्याच्या रिंग आढळल्या. या रिंगांचे वजन एकूण सुमारे सहाशे ग्रॅम आहे. त्याची किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com