लोकसेवा बॅंकेच्या पाषाण, चंदननगर शाखा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - आर्थिक खर्च आटोक्‍यात आणणे; तसेच बचतीसाठी लोकसेवा सहकारी बॅंकेच्या पाषाण आणि चंदननगर येथील शाखांचे कामकाज १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येत आहे. दरम्यान, बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने विनातारण दिलेल्या कर्जवसुलीसाठी कायदेशीर मार्गदर्शन घेऊन  लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे बॅंकेचे अवसायक आणि जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिली.

मर्यादेचे उल्लंघन करून कामकाज झाल्याने लोकसेवा सहकारी बॅंक अडचणीत आली आहे. बॅंकेचे ३२ कोटी ५७ लाख ३५ हजार रुपये कर्ज आहे.

याबाबत सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात आली असता, बॅंकेचे ४१ कोटी ७९ लाख ४६ हजार २३६ रुपये इतक्‍या रकमेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार माजी आमदार आणि बॅंकेचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्यावर २५ कोटी २८ लाख ६ हजार रुपये आणि बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय पिटके यांच्याकडे २५ कोटी २८ लाख ६ हजार रुपयांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. पायगुडे यांनी १३ कोटी ४६ लाख रुपये बॅंकेत जमा केले आहेत, असेही लावंड यांनी सांगितले.

दरम्यान, पाषाण शाखेला दरमहा ७५ हजार रुपये; तर चंदननगर शाखेला ५५ हजार रुपये भाडे भरावे लागत आहे. त्यामुळे येथील कामकाज मंगळवार पेठेतील मुख्य कार्यालयातून चालविण्यात येणार आहे. बॅंकेत ८८ पतसंस्थांचे १२० कोटी रुपये अडकले आहेत. या पतसंस्था पुणे शहर व जिल्ह्यातील असून ठेवीदारांच्या एक लाख रुपयांच्या आतील रकमेचे मिळून एकूण २९ कोटी रुपये परत करण्यात आलेले आहेत. अद्यापही १५ कोटी ८० लाख रुपये वसुली शिल्लक आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार चालू खात्यावर कॉर्पोरेशन बॅंकेत ६० लाख रुपये होते. त्याची मुदतठेव करण्यात आल्याने अधिक व्याज मिळण्यास मदत होईल. मुदत संपल्याने ट्रेझरी बिलातून मिळालेल्या १५ कोटींची ४६ दिवसांसाठी मुदतठेव केली आहे. त्यातून ९ ते १० लाख रुपयांचे व्याज बॅंकेला मिळेल. सध्या १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरमहा चार लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे खर्चात बचत करून वसुलीवर अधिक भर देण्यात येणार आहे.
- बी. टी. लावंड, अवसायक 

Web Title: pune news lokseva bank pashan chandannagar branch close