‘त्रिविध’ कंपनीचे सदस्यत्व मोफत

‘त्रिविध’ कंपनीचे सदस्यत्व मोफत

पुणे - वर्षभर विविध कार्यक्रमांचा आनंद लुटणाऱ्या मधुरांगण सभासदांना आता भाजीपाल्याची चिंता करण्याची गरज नाही; कारण रसायन विरहित व संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी भाजीपाला लावण्याची संधी ‘त्रिविध’च्या ‘सॉइल बॉक्‍स’ किटमुळे त्यांना मिळणार आहे. तसेच कंपनीचे सहा महिन्यांचे सदस्यत्वही मोफत मिळणार आहे. यातून मुलांनाही निसर्गाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. 

परदेशात नागरिक घरच्या घरी परसात शक्‍य तेवढ्या भाज्या लावतात आणि बागही फुलवितात. या सारखे उपक्रम आपल्या देशात कशा पद्धतीने राबवता येईल, याचा सर्वांगाने अभ्यास करून पुण्यातील ‘त्रिविध’ या कंपनीने ‘सॉइल बॉक्‍स’ची निर्मिती केली आहे. ‘ऑरगॅनिक फर्टिलायझर, वर्मी कंपोस्ट, बिया, कोकोपीट, सिडलिंग ट्रे, नर्सरी बॅग, नोंदवही आणि पेन या गोष्टींचा या बॉक्‍समध्ये समावेश आहे. सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सर्वांना प्रत्येक गोष्ट तातडीने हवी असते, परंतु बी रुजवल्यानंतर त्यांचे रोपट्यात रूपांतर होण्यापर्यंतच्या प्रक्रियेदरम्यान कष्ट, एकाग्रता आणि संयमाची गरज असते. या गोष्टी मुलांमध्ये रुजणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भाज्या लावणे व त्याची निगा राखणे, यासाठी ‘सॉइल बॉक्‍स’चा त्यांना पुरेपूर उपयोग होईल. 

‘त्रिविध’ कंपनीद्वारे शाळा, सोसायटी आदींनी भेट देण्यासाठी हे बॉक्‍स पुरविले जातात. ‘मधुरांगण’ने आयोजित केलेल्या ‘किड्‌स कर्निव्हल’मध्येही अनेक मुलांना ‘सॉइल बॉक्‍स’ भेट देण्यात आले होते. तसेच ते त्यांच्या सर्वांच्या पसंतीस देखील उतरले होते. मधुरांगणच्या सभासदांना हे बॉक्‍स सवलतीच्या दरात मिळणार आहेत. 

हजारो रुपयांची फ्री व्हाउचर 
वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये ९९९. 
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसहित १४९९ रुपये किमतीचा २३ पिसेसचा मल्टिपर्पज सेटची भेट. 
याशिवाय नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचरदेखील 
ऑनलाइन करणाऱ्यांना ‘प्ले स्टोअर’वर ‘Madhurangan’ टाइप करून ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. मोबाइल क्रमांकावर पासवर्ड ६ ते ७ डिजिटचा असावा. 
कुरिअरचा ऑप्शन निवडून मेंबरशिपची रक्कम व कुरिअरची रक्कम ऑन लाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) या वेळात भेटवस्तू नेता येतील 
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी -‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ६) 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com