माळीण वसतिगृह इमारतीचे आज घोडेगावात भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सकाळ रिलीफ फंड

घोडेगाव (पुणे): "सकाळ रिलीफ फंडा'तून घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिराच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या "माळीण वसतिगृह' इमारत बांधकामाचे भूमिपूजन समारंभ उद्या (ता. 23) दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे यांनी दिली.

"सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते हे भूमिपूजन केले जाणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार अशोकराव मोहोळ, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राज्याचे माजी नोंदणी महानिरीक्षक अरविंदराव सुर्वे, गोवर्धन दूध प्रकल्प समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मोरडे फूड्‌सचे संचालक हर्शल मोरडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: pune news malin hostel building Bhumi Pujan