मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक पोखरकर यांच्यावर खुनी हल्ला

sharad pokharkar
sharad pokharkar

मंचर (पुणे): मंचर येथे रविवारी (ता. १८) रात्री मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक शरद पोखरकर यांच्या घरात घुसून बजरंग दलाच्या चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला. पोखरकर यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या अन्य दोन जणांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात अवसरी खुर्द (तालुका आंबेगाव) येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता रोहित ढुमणे, स्वप्नील अशोक शिंदे, संजय भास्कर शिंदे, स्वप्नील कुशाबा भोर, (सर्व रा. अवसरी खुर्द-भोरवाडी, तालुका आंबेगाव) यांच्यासह पन्नास कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव दत्तात्रय शिंदे, व प्रकाश किसन शिंदेला अटक केली आहे.
 
मंचर येथे डोबी मळ्यातील इमारतीत पोखरकर राहतात. चर्चा करायची आहे असे सांगून बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी आले, त्यातून बाचाबाची झाली.

दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे मोफत वाटप पोखरकर व त्यांचे सहकारी माध्यमिक शाळामध्ये करत आहेत. 'हि पुस्तके का वाटता' या कारणावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोखरकर यांना मारहाण केल्याचे पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. 'अन्य आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत. येथील परिस्तिथी शांत आहे, असे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी सांगितले.

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनाही सादर घटनेची माहिती दिली आहे. आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन हक यांनी दिले आहे, असे बांगर यांनी सांगितले.

बांगर म्हणाले, 'तीन दिवसांपूर्वी पोखरकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र आले होते. शनिवारी (ता. १७) पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात पत्राबाबत फिर्याद दाखल केली आहे. हा पूर्व नियोजित कट आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com