मंचर येथे "ब्रेक फेल' एसटी घुसली दुकानात

मंचर येथे "ब्रेक फेल' एसटी घुसली दुकानात
मंचर येथे "ब्रेक फेल' एसटी घुसली दुकानात

मंचर : मंचर-मांदळेवाडी (ता. आंबेगाव) एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने पुणे-नाशिक रस्ता ओलांडून 50 फूट अंतरावर असलेल्या पेंटच्या दुकानात घुसली. मंचर बस स्थानकासमोर रहदारीच्या ठिकाणी गुरुवारी (ता. 23) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. यात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

नारायणगाव आगाराच्या एसटी बसमध्ये (एमएच 12, ईएफ 6373) 50 हून अधिक प्रवासी होते. बस स्थानकातून एसटी बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला एसटी वळविण्याच्या चालक जगन्नाथ भोर यांनी प्रयत्न केला. पण, एसटी थेट पेंटच्या दुकानात घुसली. हा प्रकार पाहून प्रवाशांनी आरडाओरड केला. एसटी बस थांबल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याची माहिती भोर यांनी प्रवाशांना दिली. या दुकानासमोर नेहमी जीप गाड्या व नागरिक उभे असतात. पण, या वेळी तेथे कुणीही नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात लोणीच्या माजी सरपंच रंजना उद्धव लंके यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत. दोन विद्यार्थिनीच्या तोंडाला मार लागला आहे. बजरंग दलाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले व पेंट दुकानाचे मालक अभिषेक बाणखेले यांनी प्रवाशांना धीर दिला. यात पेंट दुकानाचेही नुकसान झाले आहे. तसेच एसटी गाडीच्या काचा फुटल्या असून पुढील भागाचे नुकसान झाले आहे. राजगुरुनगर आगाराचे वाहतूक निरीक्षक एस. बी. लोखंडे व मंचर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. प्रवाशांना कल्याण-शिरूर एसटी गाडीतून पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com