पंधरा हजारांचा टीव्ही 'गेला' फक्त शंभर रुपयांत...

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मंचर (पुणे) : १५ हजार रुपये किमतीच्या एलईडी टीव्हीची विक्री फक्त १०० रुपयात करण्यात आल्याची घटना मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. फ्रीज खरेदी करायचा आहे, असा बहाना करून दुकानाचे मालक राजन ठिकेकर यांना बोलण्यात गुंतवून ठेवून भरदिवसा एलईडी टीव्ही चोरुन नेण्यात आला. सात जणांच्या या टोळीमध्ये दोन महिलांचा समावेश असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झालेले आहेत. मंचर शहर व परिसरात चोरी व घरफोड्यांचे प्रकार थांबत नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबद्दल नागरिकत नाराजी वाढत चालली आहे.

मंचर बस स्थानकाच्या जवळ सोनाई कॉम्प्लेक्स इमारतीत अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी त्रिमूर्ती इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. दुकानात ठिकेकर एकटेच होते. प्रथम दोन पुरुष व दोन महिला दुकानात आल्या. आम्हाला फ्रीज खरेदी करायचा आहे, असे सांगून फ्रीजचे बाजारभाव विचारात होते. त्यांनी फ्रीजचे दरवाजे उघडून पहिले. त्यानंतर दोन जण दुकानात आले. त्यांनी ईस्त्री खरेदी करायची असे सांगितले, त्यावेळीच अजून एकजण दुकानात आला. इतरांनी ठिकेकर यांना बोलण्यात गुंतवून ठेवले होते. महिलांनी ठिकेकर व एलईडी टीव्ही मध्ये उभे राहून अडथळा निर्माण केला होता. दरम्यानच्या काळात एलईडी दुकानाच्या बाहेर नेण्यात चोरटा यशस्वी ठरला. त्यानंतर चोरट्यांनी फ्रीजचे बुकिंग केले. १०० रुपये रक्कम ठिकेकर यांच्याकडे जमा केली. संध्याकाळी फ्रीज नेण्यासाठी येतो, असे सांगून चोरटे दुकानातून निघून गेले. १० मिनिटा नंतर एलईडी टीव्ही चोरीला गेल्याचे ठिकेकर यांच्या लक्षात आले. एलईडी टीव्हीचा मोबदला फक्त १०० रुपये मिळाला आहे.

चोरट्यांचा शोध घेतला पण ते मिळाले नाही. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ४० ते ४५ वयोगटाचे चार जण होते. एक तरुण २५ ते २८ वयाचा होता. महिला ३५ ते ४० वयाच्या होत्या. हिंदी व मराठीत त्या अडखळत बोलत होत्या, असे दुकानदार ठिकेकर यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :