मनोरुग्णच करतात जेवण आणण्याचे काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्थिती; अपुरे मनुष्यबळ 

विश्रांतवाडी - येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये अपुऱ्या मनुष्यबळाअभावी मनोरुग्णांनाच स्वयंपाक घरातून वॉर्डापर्यंत अन्न घेऊन जाण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे ते घेऊन जाताना योग्य प्रकारे मनोरुग्णांना ते हाताळता येत नसल्याने अन्न वाया जात आहे.  

प्रत्येक वॉर्डमध्ये साधारण २०० ते २२५ मनोरुग्ण असून, एकूण १७ वॉर्ड आहेत. या सर्व वॉर्डमध्ये जेवण घेऊन जाण्यासाठी काही अटेंडंट नेमलेले आहेत. परंतु ते अपुरे आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत तीन-चार रुग्णांना जेवण आणण्यासाठी जावे लागते. या संदर्भात मनोरुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक मधुमिता बहाले म्हणाले, ‘‘जे रुग्ण बरे होत आले आहेत, अशा रुग्णांना काहीतरी कामात गुंतवले, की त्यांचे मनःस्वास्थ्य ठीक राहते. त्यामुळे शारीरिक कष्ट पडणार नाहीत व त्यांचे मन गुंतले जाईल, अशी कामे त्यांना दिली जातात. अर्थातच आमची माणसेही त्यांच्यावर लक्ष ठेवायला असतातच. यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास दुणावतो. त्यामुळे ते बरे होण्यास याचा उपयोगच होतो. अन्न वाहून नेण्यासाठी मागील वर्षी दीड लाख रुपये खर्च करून बॅटरीवरील टेंपो घेतलेला आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून ते वाहन बंद पडले आहे. ते लवकरच दुरुस्त करून घेतले जाईल.’’

टॅग्स