आगामी साहित्य संमेलन बुलडाण्यात की बडोद्यात?

रविवार, 10 सप्टेंबर 2017

दिल्लीची माघार; आज दुपारी नागपूरमध्ये होणार घोषणा

पुणे : आगामी 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी दिल्लीने माघार घेतली आहे. त्यामुळे संमेलन बुलडाण्यात होणार की बडोद्यात? अशी चर्चा रंगली आहे. आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारास संमेलन स्थळाची घोषणा होणार आहे.

संमेलनासाठी तीन ठिकाणाहून निमंत्रण आले आहे. यामध्ये दिल्ली, बडोदा, बुलडाण्याच्या (हिवरा) निमंत्रणाचा समावेश आहे; पण दिल्लीने यातून माघार घेतल्याची माहिती साहित्य महामंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे महामंडळाचा एक गट बुलडाण्याच्या स्थळावर ठाम आहे तर दुसरा बडोद्याच्या. यापैकी कुठले स्थळ जाहीर होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)

Web Title: pune news marathi sahitya sammelan literary meet