हरवलेल्या चिमुकल्याला शिक्षकाच्या प्रसंगावधानाने सापडले घर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

या दरम्यान हेंद्रे व अमित कोद्रे यांनी हा मुलगा कोणाचा याची चौकशी केली पण त्याच्या पालकांचा शोध लागत नव्हता, त्याच्या बोली भाषेवरून हा ठाकर समाजाचा आहे. इतकेच उमगले होते. जवळ पासच्या ठाकर वस्तीत शोधूनही संकेतचे आई बाबा सापडत नव्हते. रात्री कामशेत पोलीसांचा कडे संकेतला घेऊन जातानाच संकेत थोडफार सांगत होता. आई वडील काळूराम च्या शेतावर गेले इतकेच समजले.

टाकवे बुद्रुक : वाट चुकलेल्या चार वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षकाच्या प्रसंगावधानाने सायंकाळी आई बाबा भेटले, पावसात दिवसभर भिजून गारठलेल्या लेकराला रात्री आईच्या ऊबदार कुशीत झोप मिळाली. संकेत मारूती भांगरे असे या लेकराचे नाव असून आक्की त्याची माऊली आहे.  
टिचभर पोटाची खळगी भरायला आयुष्यभर काबाडकष्ट करण्याची तयारी आई वडील करतात, प्रंसंगी मुलांना संभाळयला घरी कोण असो किंवा नसो परमेश्वरावर भरवशा ठेवून ते रोजगाराला बाहेर पडतात. अशाच रोजगाराला साईतील ठाकरवस्ती बाहेर पडली. त्यात संकेतचे आई बाबा पण होते. गावातील काळूराम (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या शेतात ते भात लावणीला आले. घरात संकेत आणि भावंडे होती. त्याला संभाळायला घरी कोणीच नव्हते.

पाडयातील आठ दहा वर्षाच्या इतर मुलांसमवेत संकेत पाडयातून बाहेर पडला. रमत गमत संकेत आणि त्याचे मित्र खेळात रमून गेली, कधी शेताच्या बांधावरून चालत पुढे तर कधी वाहत्या पाण्यात उड्या मारत गेली. किती वेळ गेला माहित नाही, पण संकेत आणि त्याच्या मित्रांची ताटातूट झाली. एकटा संकेत वाट चुकला चालत चालत साई, कचरेवाडी, घोणशेत, खरमारेवाडीतून पुढे आला रस्त्यावर त्याला कोणी हटकले नाही, कोणी चौकशी केली नाही. पावसात पूर्णपणे भिजून थंडीने कुडकुडत होता. टाकवे बुद्रुक खरमारेवाडी  रस्यालगत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूलच्या भिंतीला लागून दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास  हा मुलगा रडत होता. मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांच्या निदर्शनास हा थंडीत कुडकुडणारा संकेत आला, त्यांनी त्याला शाळेत घेऊन ओली कपडे काढून त्याला शाल आणि कुर्तांनी गुंडाळला. त्याला चक्कर येत होती, दिवसभर पोटात काहीच नसावे. म्हणून उषा असवले व करूणा शर्मा या कर्मचारीनी त्याला शाळेत दूध बिस्किटे खाऊ घालून घरी जेवू घातला.

या दरम्यान हेंद्रे व अमित कोद्रे यांनी हा मुलगा कोणाचा याची चौकशी केली पण त्याच्या पालकांचा शोध लागत नव्हता, त्याच्या बोली भाषेवरून हा ठाकर समाजाचा आहे. इतकेच उमगले होते. जवळ पासच्या ठाकर वस्तीत शोधूनही संकेतचे आई बाबा सापडत नव्हते. रात्री कामशेत पोलीसांचा कडे संकेतला घेऊन जातानाच संकेत थोडफार सांगत होता. आई वडील काळूराम च्या शेतावर गेले इतकेच समजले. पोलीसांनी जवळपासच्या गावात फोन करून या बाबत चौकशी तर संकेत साईच्या ठाकर वस्तीला आहे हे समजल्यावर पोलीसांनी  संकेतच्या आई बोलून संकेत त्यांच्या स्वाधीन केला. पोलीस कर्मचारी एम. आर. वाळुंजकर, पी. आर. पवार  यांचे सहकार्य लाभले. संकेतचे आई बाबा पोलीस आणि शिक्षकांचे आभार मानायला विसरले नाहीत.  

पुणे

पिंपरी - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना...

07.21 PM

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हडपसर प्रभाग...

07.15 PM

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM