मावळ तालुक्यात वाढला मजुरांचा थाट, ने-आण करायला चारचाकी, नाश्ता-पाणी

रामदास वाडेकर
सोमवार, 17 जुलै 2017

टाकवे बुद्रुक : शेताच्या मालकापेक्षा शेतमजुरांचा थाट लय भारी असल्याचे चित्र मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास पाहयला मिळते. मागील दहा वर्षांपासून शेतमजुरांचा लय भारीच थाट होऊ लागला आहे. घरापासून शेताच्या बांधावर यायला मजूरांना चारचाकी गाडीची सोय झाली आहे. दुपारच्या न्याहारी पूर्वी देशी, जेवण झाल्यावर चघळायला गायछाप, किंवा गुटखा पुडी अशी मिजास राखावी लागते. शिवाय दिवसभर काम करून झाल्यावर, उद्या लवकरच या दुसरा कोणाला भरवसा देऊ नका, सकाळी लवकरच घ्यायला येतो अशी गळ घालावी लागते. सांजच्याला माघारी फिरणाऱ्या मजूराला वारंवार विणवणी करण्यात येते. 

शेतात शेतमजूर म्हणून राबणा-या पुरुषाला आणि महिलेला घरधन्या पेक्षा अधिक जपले जाते.त्यांचा मोठा थाटमाट ठेवावा लागतोय नाही तर शेतात राबायला मजूर मिळणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात हे मावळातील पारंपारिक पिक, लावणी, बेणणी आणि कापणी या पिकातील कष्टाची कामे, मावळातील पडीक माळराने विकली असली तरी अजून बऱ्यापैकी भात शेती टिकून आहे. त्यामुळे अजून तरी मावळात इंद्रायणीचा सुगंध दरवळतोय, सध्या लावणीची कामे जोरात सुरू आहे.भात लावणीला मजूरांचा तुटवडा झाला आहे. परिसरातील कारखानदारीत आणि फार्महाऊसेवर रोजगार मिळू लागल्याने शेतात काम करायला माणसे मिळेनात,लाडकी सूनबाई चिखलणीची कामे नको म्हणू लागली.

भात लावणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मजूरांची गरज वाढली,मजूरांना जास्त जपावे लागत आहे. कातकरी, ठाकर, आदिवासी समाजातील हे शेतमजुरांना घ्यायला पाडयावर आता सकाळी लवकरच चारचाकी वाहनांची रीघ लागतेय. सकाळी आणि पुन्हा दुपारच्या न्याहारीला देशी दयावी लागते. गायछाप आणि विमल गुटखा चालणाऱ्या ही पण पुडी द्यावे लागते. शिवाय दोन वेळेला जेवण आणि तीनशे रुपये मजूरी दयावी लागते. शेतमजुरांचा इतका थाट करूनही दुसर्‍या दिवशी ते येतीलच याची शाश्वती नसल्याने त्यांची मनधरणी करावी लागते ते निराळेच.

मावळातील गाव कोणतेही असो, सध्या शेतमजुरांची मनधरणी करताना शेतकरी पाडयावर दिसणार हे निश्चित आहे. त्यातच खेडया पाडयातील शेतमजूरांना वडगाव, कान्हे, कामशेत, टाकवे बुद्रुक, पवनानगर, वराळे, नवलाख उंब्रे, सोमाटणे, बेबडओहळ, नाणे आदी मोठया गावातून मागणी वाढल्याने सध्या शेतकऱ्यांना पेक्षा शेतमजुराचा थाट लय भारी आहे.

टॅग्स