तिन्ही दलांत वैद्यकीय सेवेसाठी छात्र होणार दाखल

pune
pune

पुणे : बॅन्डपथकांच्या आणि बिगुलच्या निनादात 52 व्या तुकडीच्या शिस्तबद्ध पथसंचलनाने दिक्षांत सोहळा बुधवारी दिमाखात संपन्न झाला. पदवीप्रदानानंतर सर्व वैद्यकीय पदवीधर छात्रांना सामुदायिक शपथ देण्यात आली.

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथसंचलन मैदानावर हा दिक्षांत संचालन सोहळा लष्करी पार पडला.

यावेळी लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी लष्करी दलाचे वैद्यकीय सेवा महासंचालक (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे) आणि मेजर जनरल माधुरी कानेटकर उपस्थित होते. यावेळी खुल्या जीपमधुन पथसंचलनाची पाहणी केली. तत्पुर्वी हेलिकॉप्टरमधुन पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पथसंचलनाचे नेतृत्व छात्र अब्बास गाझी नक्वी याने केले. यंदाच्या वर्षी 127 पदवीधर छात्रांनी पाच वर्षांचा 'एमबीबीएस'चा अभ्यास पूर्ण केला आहे. यामध्ये 5 परदेशी छात्रांचा देखील समावेश आहे. एकुण 89 वैद्यकीय छात्र हे लष्करी सेवेत रुजू होणार आहेत. 6 नौदलात तर 8 छात्र हवाईदलात मध्ये दाखल होतील. यंदाच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ठ व अष्टपैलू छात्र पारितोषिक शैलजा त्रिपाठी हिला देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ठ छात्र पारितोषिक हरीश पंत याला देण्यात आला. या सोहळ्यास लष्कराचे आजी-माजी अधिकारी, छात्रांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"वैद्यकीय पदवीधर छात्र आता तिनही दलांमध्ये दाखल होत आहेत. पाच वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर हा मैलाचा दगड असणार आहे. लेफ्टनंट आणि फ्लाइंग ऑफिसर म्हणुन वैद्यकीय सेवा देताना नेतृत्वकौशल्याची देखील कसोटी लागणार आहे. देशसेवा हेच उद्दीष्ट सर्वांचे असले पाहीजे. तुम्हा सर्वांसह एफएमसीच्या स्टाफसह सर्व उपस्थित पालकांचे देखील आभार. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. " 
- लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी, लष्करी आरोग्यसेवेचे महासंचालक.

दिक्षांत पथसंचलनानंतर चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. यात हवाई दलाच्या आकाश गंगा विभागाने सादर केलेले प्रात्यक्षिक 'स्काय डायव्हिंग' हे विशेष आकर्षण होते. तसेच 'इंडियन मार्शल आर्ट' म्हणजे केरळाच्या 'कलरीपयट्टु' युद्धकलेचे सादरीकरण झाले. 

"माझ्या कुटुंबात लष्करी पार्श्वभुमी नाही. पाच वर्षांपुर्वी मी एनडीएमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर एफएमसीमध्ये प्रवेश मिळाला. माझ्या आईचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आणि माझे लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न आज पुर्ण झाले."
- अब्बास गाझी नक्वी, फ्लाइंग ऑफिसर, नौदल

"लहानपणापासुन डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. तसेच लष्कराचे देखील आकर्षण होते. पांढरा कोट घालण्यापेक्षा लष्कराचा गणवेश जास्त अभिमानास्पद वाटतो."
- शैलजा त्रिपाठी, फ्लाइंग ऑफिसर, हवाईदल

" माझ्या घरात कोणीही लष्करात नाही. माझ्यासाठी व कुटुंबियांसाठी पदवाप्रदान व पथसंचलनाचा ऐतिहासिक क्षण आहे."
-  हरिश पंत, फ्लाइंग ऑफिसर, हवाईदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com