मेट्रो कात्रजपर्यंत नेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची मोट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - पिंपरी-स्वारगेट मार्गावरील मेट्रो पहिल्या टप्प्यातच कात्रजपर्यंत असावी, या मागणीसाठी दक्षिण पुण्यातील सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या आठवड्यात साकडे घालणार आहेत. हा मार्ग एलिव्हेटेड का भुयारी असावा, याचा निर्णय घेण्यासाठी तातडीने तांत्रिक तपासणी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शहरातील मेट्रो प्रकल्पाबाबत महामेट्रोतर्फे महापालिकेच्या सभागृहात सोमवारी सादरीकरण करण्यात आले. त्या दरम्यान राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर, सरस्वती शेंडगे, बाळू धनकवडे, युवराज बेलदरे आदींनी "महामेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना निवेदन सादर केले. त्या वेळी मेट्रोचा मार्ग कात्रजपर्यंत नेण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. तो तयार झाल्यावर मेट्रोचा मार्ग विस्तारीकरण होऊ शकेल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मेट्रोमार्ग कात्रजपर्यंत नेण्यासाठी येत्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची दक्षिण पुण्यातील सर्वपक्षीय नगरसेवक भेट घेणार आहेत. मेट्रो प्रकल्पाचे सुरू असलेले काम कात्रज हा मेट्रो मार्गावरील शेवटचा थांबा गृहीत धरून व्हावे, असे त्यांना सांगणार आहोत. तसेच हा मार्ग भुयारी की एलिव्हेटेड असावा, याचा तांत्रिक अहवाल तातडीने तयार करावा, अशी मागणी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

Web Title: pune news metro issue