पेयजल योजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे - बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पुणे - ‘राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गावांच्या समूहाचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. या अभियानांतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे,’ अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. 

स्थानिक आर्थिक विकास करणे, ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा विकास करणे व नियोजनबद्ध गाव समूह निर्माण करण्याच्या उद्देशाने श्‍यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान राबविण्यात येते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा आढावा पालकमंत्री बापट यांनी आज घेतला. या वेळी आमदार बाळा भेगडे, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, बाबूराव पाचर्णे, सुरेश गोरे, दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते. 

या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वडगाव (ता. मावळ) येथील गाव समूहाच्या आराखडा निश्‍चितीस बैठकीत मान्यता देण्यात आली.