मध्यवर्ती भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश 

मध्यवर्ती भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश 

पुणे - महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीतून होणारा 70 ते 80 मेगावॉट वीजपुरवठा; तसेच सात उपकेंद्र बंद पडल्यानंतर महावितरणने इतर उपकेंद्रांतून पर्यायी व्यवस्था केली. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) शहराच्या मध्यवर्ती परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आल्याचा दावा महावितरणने केला आहे. 

जेसीबीने साफसफाई करत असताना दत्तवाडी येथील महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली. त्यामुळे गुरुवारी अनेक भागांत वीज गायब झाली होती. चेन्नई येथून महापारेषणने मागविलेले "जाइंट' शुक्रवारी सायंकाळी पुण्यात पोचला. दुरुस्तीच्या कामाला सायंकाळी उशिरा सुरवात झाली असून शनिवारी (ता. 23) सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असेही महावितरणने म्हटले आहे. 

दरम्यान, दारूवाला पूल (रविवार पेठ) व मंगळवार पेठ परिसरात प्रत्येकी एक तासाचे चक्राकार पद्धतीने दोन तास भारनियमन करण्यात आले. विजेची मागणी वाढल्यास व भारव्यवस्थापन शक्‍य झाले नाही, तर नाइलाजाने काही भागांत चक्राकार पद्धतीने 3 ते 4 तासांचे भारनियमन करावे लागेल. ग्राहकांनी कमीतकमी विजेचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com