महापालिका सतर्क

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

स्वाइन फ्लूच्या चार हजार लस मोफत देण्यास सुरवात

पुणे - स्वाइन फ्लूचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या सव्वा लाख लसींची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच महापालिकांनीही त्यांच्या पातळीवर ही लस खरेदी करण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत चार हजार लस उपलब्ध करण्यात आल्या असून, त्या मोफत देण्यास सुरवात झाली आहे.

हे करा 
वारंवार स्वच्छ पाणी व साबणाने हात धुवा
पौष्टिक आहार घ्या
भरपूर पाणी प्या

स्वाइन फ्लूच्या चार हजार लस मोफत देण्यास सुरवात

पुणे - स्वाइन फ्लूचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या सव्वा लाख लसींची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच महापालिकांनीही त्यांच्या पातळीवर ही लस खरेदी करण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत चार हजार लस उपलब्ध करण्यात आल्या असून, त्या मोफत देण्यास सुरवात झाली आहे.

हे करा 
वारंवार स्वच्छ पाणी व साबणाने हात धुवा
पौष्टिक आहार घ्या
भरपूर पाणी प्या

हे टाळा
हस्तांदोलन
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

गर्भवती, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, ज्येष्ठ नागरिक यांना स्वाइन फ्लू होण्याचा धोका अधिक असतो. त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी असल्याने स्वाइन फ्लूच्या उपचारातील गुंतागुंत वाढते. तसेच डॉक्‍टर आणि परिचारिका यांनाही संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे खरेदी करण्यात येत असलेली ही लस जोखमीच्या रुग्णांना आणि रुग्णसेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. वाढता धोका लक्षात घेऊन जास्त प्रमाणात लस खरेदी केली जात आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी 

धोका वाढतोय 
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या वर्षी उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले होते. कमाल आणि किमान तापमानाच मोठी तफावत असल्याने स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूंना पोषक वातावरण तयार झाल्याने उन्हाळ्यातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याची माहिती आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी दिली. तसेच पावसाळी वातवारणामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले. कमाल तापमानाचा पारा कमी झाला. या वातावरणातही या विषाणूंचा संसर्ग वाढला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

प्रतिबंधक लसींचा वापर
स्वाइन फ्लूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लसींचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य खात्याने घेतला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू प्रतिबंधक सव्वा लाख लस खरेदी करण्यात येत असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. 

मोफत लस

शहरांमध्ये ही लस खरेदीची प्रक्रिया महापालिका करत आहे. त्यात पुणे, मुंबई, ठाणे अशा महापालिकांनी लस खरेदी केली जात आहे. 
पुणे महापालिकेच्या उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘महापालिकेने आतापर्यंत चार हजार स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी केली असून, आवश्‍यकता भासल्यास अजून लस खरेदी करण्यात येतील. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे.’’

स्वाइन फ्लूने मृत्यू (राज्यात)

३८७ - २०१७

२६ - २०१६

९०५ - २०१५

स्वाइन फ्लूचे लक्षणे

ताप
थंडी

डोके दुखी
उलट्या 

३१ मेपर्यंत राज्यात  

३२ हजार प्रतिबंधक लस

Web Title: pune news municipal alert for swine flu