पालिकेच्या आरोग्य सुविधा अशक्‍त!

Municipal-Health-Facility
Municipal-Health-Facility

पुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९ पदे रिक्‍त आहेत. तसेच आरोग्यविषयक मानांकन आणि राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार शहरातील सर्व प्रसूतिगृहे आणि उपलब्ध रुग्णालयांतील खाटांची संख्याही तुलनेने कमी आहे. शहरवासीयांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा अपुऱ्याच असल्याचे वास्तव समोर आले असून, त्याचा परिणाम रुग्णांना मिळणाऱ्या सेवेवर होत आहे. 

पुणे महापालिकेकडून सध्या ४६ बाह्यरुग्ण विभाग, १७ प्रसूतिगृहे तसेच नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 

या सर्व ठिकाणी सध्या १४८ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु ही संख्या तुलनेने कमी आहे. आरोग्य विभागात सध्या वैद्यकीय अधिकारी आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९ पदे रिक्‍त आहेत.

खाटांची संख्याही कमी  
पालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये एकूण खाटांची संख्या ११४६ इतकी आहे. तर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या १४ हजार ७२३ इतकी आहे. सन २००१ मध्ये उपलब्ध खाटांची संख्या ९०६ इतकी होती. सन २००८ मध्ये त्यात 
१८० खाटांची भर पडली. तर सन २०११ पासून २०१७ पर्यंत गेल्या सात वर्षांत त्यात केवळ ६० खाटा वाढल्या आहेत. यावरून गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सुरू असलेला ‘पारदर्शी’ कारभार समोर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com