महापालिकेच्या मदतीचे धनादेश ‘बाऊन्स’

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 11 जुलै 2017

दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पैसे न मिळाल्याने मनस्ताप

पुणे - शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने अर्थसाहाय्य केले जाते. परंतु, मदतीच्या रकमेचा त्यांना दिलेला धनादेश वटत नसल्याचे आढळून आले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर गाजावाजा करून ही योजना राबविणाऱ्या महापालिकेच्या प्रतिष्ठेचाही प्रश्‍न तितकाच गंभीर आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून धनादेश उशिराने मिळाले आहेत, त्याकरिता अनेकदा चकरा माराव्या लागल्या. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, अशी तक्रार पालक करीत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना आता धनादेश दिले जात आहेत. बॅंकेत ते वेळेत भरणे अपेक्षित असून, काही विद्यार्थ्यांनी ते उशिराने भरले आहेत. त्यामुळे धनादेश वटत नसल्याच्या काही तक्रारी असल्याचे महापालिकेच्या नागर वस्ती विभागाने स्पष्ट केले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६५ ते ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आणि अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अर्थसाहाय्य केले जाते. त्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १५ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची मदत केली जाते. या योजनांसाठी सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना ८० टक्के, मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७० टक्के, तर अपंग विद्यार्थ्यांना ६५ टक्के गुण मिळणे अपेक्षित आहे. एवढे गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडे अर्ज करावा लागतो, त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याच्या नावाने धनादेश देण्यात येतो.

या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मदतीसाठी गेल्या वर्षी सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना त्या त्या रकमेचा धनादेश देण्यात येत आहे. मात्र, हा धनादेश मिळविण्यासाठी पालक- विद्यार्थ्यांना अनेक चकरा माराव्या लागल्या. त्यातच, धनादेश वटत नसल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. भानगिरे म्हणाले, ‘‘आधीच महापालिकेकडून विद्यार्थ्यांना उशिराने धनादेश मिळत आहेत, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.’’

समाधानकारक उत्तर नाही
हडपसरमधील काळेपडळमध्ये राहणाऱ्या भीमराव निवृत्ती कांबळे या दहावीतील विद्यार्थ्याच्या नावाचा धनादेश वटला नाही. या मदतीवर अवलंबून असलेल्या भीमराव याची अडचण झाली असून, नगरसेवक नाना भानगिरे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी त्याने संपर्क साधला. मात्र, त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने भीमरावसह त्याच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

विद्यार्थ्यांना वेळेत धनादेश देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, काही कारणास्तव उशीर होत असला, तरी विद्यार्थ्यांनी बॅंकेत तो वेळेत भरावा. वेळेत भरला जात नसल्याने तो वटत नाही. मात्र, अशा विद्यार्थ्यांना नव्याने धनादेश दिले जातील.
- संजय रांजणे, प्रमुख, नागरवस्ती विभाग