महानगरपालिकेच्या शाळांसाठी ‘आदर’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - महिनोन महिने पाठपुरावा करूनही शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘आदर फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या शाळांमध्ये शिक्षक पुरविण्यासाठी ‘शाळेचा आदर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. याची सुरवात सहकारनगरमधील वि. स. खांडेकर शाळेत (इंग्रजी माध्यम) चार शिक्षक नेमून करण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक भरतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका दिशा माने यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी सहकारनगरमधील महापालिकेच्या शाळांमध्ये पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मागणीनुसार शिक्षक पुरविण्यात येतील. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. 

त्यानंतर या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. खांडेकर शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, सुमारे पावणेपाचशे विद्यार्थी आहेत. या शाळेत १४ शिक्षकांची मागणी आहे. प्रत्यक्षात येथे १० शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तरीही या शाळेत पुरेसे शिक्षक दिले जात नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून चार शिक्षक नेमणार असल्याचे  माने यांनी सांगितले. या शिक्षकांचे मानधन फाउंडेशनतर्फे देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राहुल माने 
यांनी सांगितले.