पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात 

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात 

पुणे - अनैतिक संबंधाचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पती स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला. ही घटना सोमवार पेठेमध्ये रविवारी रात्री घडली. 

दीपा मलयकुमार सिंग ऊर्फ दीपा राजेंद्र असवरे (वय 26, रा. पिंपरी-चिंचवड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक श्‍वेता शिंदे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मलयकुमार देवेंद्रप्रसाद सिंग (वय 37, रा. कोकणीवाडा, मुंबई) याला अटक केली. दीपा व मलय यांची काही वर्षांपासून मैत्री होती. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दीपा ही काही महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर ती पुन्हा पतीकडे राहण्यास गेली नाही. दीपाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मलयकुमारला होता. 

एम्ब्रॉयडरी कारागीर असणारा मलयकुमार रविवारी पुण्यात आला होता. त्याने सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेतली होती. त्याने सायंकाळी दीपाला हॉटेलवर बोलावल्यानंतर दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. त्यातून मलयकुमारने नाडीने दीपाचा गळा आवळून खून केला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मलयकुमार स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. तसेच त्याने खुनाची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com