पुणेः स्वारगेट परिसरात गॅरेजचालकाचा गळ्यावर वार करून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे: स्वारगेट परिसरात पर्वती पायथ्याजवळ गॅरेजचालकाच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुणे: स्वारगेट परिसरात पर्वती पायथ्याजवळ गॅरेजचालकाच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

श्रीकांत हिंगसे (वय 35, रा. बालाजीनगर) असे मृताचे नाव आहे. ते मूळचे बार्शी येथील असून, दहा-बारा वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. हिंगसे यांचे पर्वती पायथ्याजवळ भाडेतत्त्वावरील जागेत साक्षी ऑटोमोबाईल नावाचे दुचाकी वाहनांचे गॅरेज आहे. ते काल रात्रभर घरी गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी दहाच्या सुमारास गॅरेजच्या शेजारी असलेल्या दुकानमालकास फोन केला. त्यावेळी त्यांना गॅरेजचे शटर बंद दिसले. पण शटरला कुलूप नव्हते. त्यांनी शटर उघडून आत पाहिले असता, हिंगसे यांचा मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. त्यानंतर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रविण मुंढे आणि वरिष्ठ निरीक्षक फारूक काजी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी कटर सापडले असून, त्यावर रक्‍ताचे डाग आढळून आले आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक काजी यांनी दिली.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

पुणे

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली...

08.48 AM