माध्यान्ह वेळेपर्यंत घटस्थापनेचा समुहुर्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे - शारदीय नवरात्रोत्सव आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून (ता. 21) सुरू होत आहे. सूर्योदयापासून माध्यान्ह वेळेपर्यंत घटस्थापनेचा समुहुर्त आहे. 

या निमित्ताने ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासह शहरातील विविध मंदिरांतील घटस्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रतिपदा ते विजयादशमीसह कोजागरी पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवात ललिता पंचमी, कन्यापूजन, नवचंडी याग, अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आदी कार्यक्रमांसह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनही मंदिर व्यवस्थापनांमार्फत करण्यात आले आहे. 

ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी 
गुरुवारी (ता. 21) पहाटे साडेपाच ते साडेसहादरम्यान देवीच्या मूर्तीची षोडशोपचारे पूजा व घटस्थापना होईल. उत्सवात प्रथा व परंपरेप्रमाणे दररोज वेगवेगळ्या वाहनावरची देवी पूजा असते. नवचंडी याग, कुमारिका पूजन आदी कार्यक्रमही उत्सव काळात असतील. दसऱ्याला सकाळी दहा वाजता सिमोल्लंघनाची मिरवणूक निघेल, अशी माहिती विश्‍वस्त सागर बेंद्रे यांनी दिली. 

भवानी माता मंदिर 
प्रतिपदेला सकाळी सहा ते नऊ दरम्यान देवीच्या मूर्तीस रुद्राभिषेक, महापूजा होईल. तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन असेल. सकाळी अकरा वाजता घटस्थापना होईल. दुपारी पुणतांबेकर भजनी मंडळाचे भजन होईल. तर सायंकाळी अपर्णा रास्ते यांचे भजन होईल. "आर्ट ऑफ लिव्हिंग'तर्फे सत्संग होणार असून, रात्री नऊ वाजता चिन्मय देशपांडे यांचे कीर्तन आयोजिले आहे. दशमीनंतर आश्‍विन शुद्ध पौर्णिमेला अर्थात कोजागरी पौर्णिमेला देवीच्या मूर्तीचा छबिना निघेल, असे विश्‍वस्त नरेंद्र मेढेकर यांनी कळविले. 

चतुःशृंगी देवस्थान 
प्रतिपदेला सकाळी घटस्थापना होईल. देवीला अभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येईल. उत्सवात गणपती मंदिरात रोज दुपारी भजन होईल. नवचंडी याग 29 सप्टेंबरला आहे. तर दसऱ्याला सिमोल्लंघनाच्या मिरवणुकीदरम्यान देवीच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. गंगाधर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महालक्ष्मी मंदिर 
सकाळी साडेसात वाजता स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते प्रतिपदेला धार्मिक व पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होईल. त्याचदिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन होईल, असे विश्‍वस्त भरत अगरवाल यांनी कळविले. 

संतोषी माता मंदिर (कात्रज) 
प्रतिपदेला सकाळी अकरा वाजता नवीन व रजनी शहा यांच्या हस्ते घटस्थापना होईल. तत्पूर्वी सुहान लिपानी परिवारातर्फे देवीची महापूजा व आरती होईल. गेली 35 वर्षे मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो. मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, पायऱ्यांपासून गाभाऱ्यापर्यंत मार्बल बसविण्यात आले आहे, अशी माहिती विश्‍वस्त सुनील शहा व गिरीश शहा यांनी दिली.

Web Title: pune news Navratri