राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर पक्षसंटना मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा बुधवारी (ता. 5) पुण्यात मेळावा होणार आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यात आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरण्याची शक्‍यता येत आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर पक्षसंघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षाचे नेते जिल्हा पातळीवर मेळावे घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात सकाळी दहा वाजल्यापासून शहर तर, मार्केट यार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल. त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतर पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. पक्षसंघटनेतील संभाव्य बदलांबाबतही या वेळी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायती समित्यांच्या निवडणुकीतील कामगिरीबाबतही चर्चा होणार आहे.