अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे-बारामती सायकल स्पर्धा

मिलिद संगई
शुक्रवार, 21 जुलै 2017

बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत माहिती दिली.

बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत माहिती दिली.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा पाच विविध गटात होईल. पुणे ते बारामती ही स्पर्धा 120 कि.मी. अंतराची असून ती पुणे ते सासवड आणि सासवड ते बारामती अशा दोन टप्प्यात राष्ट्रीय व राज्य स्तरावर होईल. तर माळेगाव ते बारामती ही 15 कि.मी. ची स्पर्धा महिलांसाठी होणार असून ती देखील राष्ट्रीय व राज्यस्तरीय असेल. सर्व वयोगटातील मिळून चारशेहून अधिक स्पर्धक यंदा सहभाग नोंदवतील.

प्रामुख्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण-मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व रेल्वे, एअरफोर्स, तामिळनाडू, बिहार, गुजरात, मध्य रेल्वे, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. यंदा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त अतुल कुमार, सतिशकुमार (सेनादल),  दिलीप माने व अझिझ कुरबु (सांगली) गणेश पवार, ऋतुजा सातपुते व गतवर्षीचा विजेता सदबिरसिंग सहभागी होतील.

दिवेघाट प्रथम पार करणा-या स्पर्धकास 'घाटाचा राजा' तर जेजुरी येथे येणा-या प्रथम स्पर्धकास 'जय मल्हार' पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे, तर प्रथम तीन सायकलपटूंना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पर्यावरणाचा संदेश व  सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी पुणे ते हडपसर वेगळ्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे पर्यावरणसंवर्धन, प्रदूषण, वाहतूक नियंत्रण, मुलगी वाचवा, स्वच्छता अभियान असे संदेश देण्यात येतील. या रॅलीत 3500 विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी होणार आहेत.

पुण्यातील शनिवारवाड्यापासून शनिवारी सकाळी साडेआठला सायकल रॅली निघून हडपसर पर्यंत स्पर्धेविना येईल व हडपसरपासून मुख्य स्पर्धा सकाळीसाडेनऊला सुरु होईल. बारामतीत दुपारी अडीच वाजता गदिमा  सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ होईल.

बारामतीत सायकलपटूंचे होणार स्वागत
दरवर्षीप्रमाणेच यंदा बारामती नगरीत सायकलपटूंचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार असून, विद्यार्थी व नागरिक ठिकठिकाणी उभे राहून सायकलपटूंना प्रोत्साहन देणार आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: