विद्यार्थ्यांचे करिअर निवडताना कल पाहणे गरजेचे - प्रा. बिचे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे - ‘विद्यार्थ्यांचे करिअर निवडताना पालकांनी त्यांचा कल पाहणे महत्त्वाचे आहे. पालक आणि पाल्य प्रयत्नवादी असतील तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्‍चित आहे,’’ असे मत प्रा. दीपक बिचे यांनी व्यक्त केले.

सकाळ प्रेस कामगार सहकारी पतपेढीतर्फे आयोजित सभासदांच्या पाल्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. या वेळी ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, पतपेढीचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, पदाधिकारी, संचालक आणि सभासद उपस्थित होते.

‘‘प्रत्येकात काहीतरी कौशल्य असते, ते शोधले पाहिजे. दहावीनंतर कलचाचणी केल्यास पुढील शाखानिवडीस त्याचा फायदा होतो. पाल्याच्या यश-अपयशात पालकांनी त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे. पाल्याची तुलना इतरांशी करू नका. विद्यार्थ्यांनीही अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे लक्ष द्यावे, वाचनाची आवड जोपासावी, संवाद कौशल्य वाढवून एखादी तरी वेगळी भाषा शिकली पाहिजे,’’ असेही प्रा. बिचे यांनी सांगितले.

‘‘पाल्यांना आनंददायी शिक्षण द्या. आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी द्या. आपल्या इच्छा-अपेक्षा त्यांच्यावर लादू नका,’’ असे सुतार यांनी सांगितले. प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केले, तर नवनाथ पासलकर यांनी आभार मानले.