ते नेहमी परखड मते मांडायचे - वडके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे - ‘‘वाहतुकीचा प्रश्‍न असो की, मोबाईलचे फायदे-तोटे असोत. या विषयांवर दिवंगत व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर व्यंग्यचित्रांतून नेहमीच परखड मते मांडत असत. येत्या गणेशोत्सवात व्यंग्यचित्रांवर आधारित देखावा करणार आहोत. हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल,’’ अमोद वडके हा अनुभव सांगत होते. 

कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाचे वडके अध्यक्ष आहेत. गणेशोत्सवासाठी त्यांनी तेंडुलकर यांना व्यंग्यचित्रे काढून देण्याची विनंती केली होती. आजारी असतानाही त्यांनी मागच्या शुक्रवारी चित्रे पूर्ण केली.  याविषयी वडके म्हणाले, ‘‘शुक्रवारी रात्री साडेदहा-अकरा वाजताची त्यांच्या घरी मी गेलो होतो. मोबाईलचे फायदे-तोटे या विषयावर ते ३५-४० चित्रे काढून देणार होते; पण ते म्हणाले, ‘माझी तब्येत ठीक नसल्याने मी उद्या रुग्णालयात दाखल होणार आहे.’ ते आजारी होते; परंतु मनाने खंबीर होते. चित्रांतून ते वास्तव मांडायचे. त्यांची चित्रे समाजप्रबोधनात्मक आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी अनेक चित्रे काढून दिली.’’